Welcome

“सदैव जनहितार्थ सेवा, सहकार, प्रबोधन आणि सहकार्य”







Our Services

Social
Always working for the benefit of society. To do the work of enlightenment in tribal and backward society.

Health
Society are given health guidance with the help of expert doctors. A blood donation camp was organized.

Education
To strive for the educational and economic upliftment of the backward people.

Sports
To make good officials out of the students and strive to make good players out of sports.
Why Us?
Focus
We have a very clear objective, and we never give up on reaching it: we concentrate on providing customers with high-quality, pure products in order to increase business profitability.
Team
One man never accomplishes everything We firmly believe in the power of teamwork. To achieve anything significant, you need a team, and the results are astounding.
In Time
Time respects you if you respect it, so we think it's important to adhere to the schedule in order to complete tasks on schedule and maximize productivity.to expanding organizations.
Result
When you work diligently with your complete staff and adhere to the schedule with respect, your Organisation will expand and become lucrative, with everyone receiving a fair part.
For Registration
Meet The Founder

ब्रीदवाक्य : “सदैव जनहितार्थ सेवा, सहकार, प्रबोधन आणि सहकार्य”
आधुनिक भारताच्या जडणघडणीत अनेक सामाजिक संस्थांचे योगदान
मोठे आहे. आम्ही बोंडले गावातील तरुण विचार विनिमय करताना सामाजिक व आर्थिक प्रश्न
आमच्यासमोर आले. ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रबोधन व कार्य करण्यास व्यासपीठाची गरज
आहे असे लक्षात आले. त्यातूनच संस्थेच्या स्थापनेचा मनोदय झाला. त्यासाठी आम्ही
अनेक वेळा चर्चा केल्या. चर्चेच्या माध्यमातून “जनहित विकास बहुउद्देशीय सेवाभावी
संस्था” या नावाचा उदय झाला.
जन म्हणजे रयत, प्रजा, जनता, लोक असा समानार्थी शब्द मात्र माणूस हाच सर्वांचा
केंद्रबिंदू आहे. या मानव जातीतील गरजूंसाठी कार्य करता यावं म्हणून या संस्थेची
स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. धर्मादाय आयुक्त सोलापूर यांच्याकडे १३/११/२०१३ रोजी
रीतसर नोंदणी केली. त्यानुसार १२/०२/२०१४ नोंदणीचे प्रमाणपत्र प्राप्त झाले.
आमच्या कार्याचा प्रारंभ झाला.
या संस्थेच्या
उद्घाटन समारंभ २६/११/२००८ च्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांच्या
स्मृतीदिनानिमित्त घेण्यात आला. तो दिवस आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून निवडला
होता. अशोक कामटे, हेमंत करकरे, विजय साळसकर या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आणि इतर
अनेक पोलिसांनी आतंकवाद्यांना पकडताना आपल्या प्राणाची बाजी लावली. या सर्वांनी
जीवापेक्षा कर्तव्याला महत्त्व दिले होते. अशा अधिकाऱ्यांची आठवण ठेवणे हे आपलं कर्तव्य आहे. स्वाभिमान, कर्तव्य,
राष्ट्रनिष्ठा, सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम त्यांनी केलं. असंच काम संस्थेच्या
माध्यमातून करण्याचा आमचा मानस आहे. या संस्थेच्या उद्घाटनासाठी मा.रणजीतसिंह मोहिते
पाटील (माजी खासदार) धैर्यशील मोहिते पाटील (सदस्य जिल्हा परिषद सोलापूर) हे
उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शहीद राहुल शिंदे यांचे वडील मा. श्री वीरपिता
सुभाष विष्णु शिंदे मु. पो. राहुलनगर ता. माढा तर विक्रमसिंह सुरेशराव शिंदे (आर्मी
सिग्नल ऑपरेटर) यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख वक्ते म्हणून देवाजी चव्हाण
बार्शीकर यांनी समाज प्रबोधन पर व्याख्यान दिले. जनहित विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक व मार्गदर्शक – डॉ.संतोष हनुमंत जाधव,
अध्यक्ष – प्रकाश गायकवाड, सदस्य सचिन वाघमारे, सुनील जाधव, दत्तात्रय भगत, बापूराव जाधव, बाळासो जाधव, बाळासो शिंदे, अनिल जाधव, विकास नाईकनवरे, उत्तम जाधव यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून संस्थेच्या कार्याची सुरुवात केली.
Our Result

Contact Us
Address
A/P- Bondle
Tal – Malshiras
Dist – Solapur
Pin – 413113
Email id
janhitbondle444@gmail.com
san.jadhav33@gmail.com
Cell
9850558576
8080918058
7875090855